“मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!”, अमोल मिटकरी यांच्या ट्विटने चर्चांना उधाण!
आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त अमोल मिटकरी यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई, 22 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नुकतेच सत्तेत सामील झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, आज महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्रांचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. अमोल मिटकरी यांनी नेमकं काय ट्वीट केलं आहे, हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
Published on: Jul 22, 2023 07:07 AM