नाफेडमध्ये हरभरा विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी शेतकरी रांगेत; पोलिसांकडून लाठीचार्ज
अमरावतीच्या धामणगाव इथे हमीभावाने हरभरा खरेदीसाठीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पाहा व्हीडिओ...
अमरावती : अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर इथे हमीभावाने हरभरा खरेदीसाठीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. हजारो शेतकरी आपल्या हरभऱ्याच्या नोंदणीसाठी आले होते. पण ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. शासनाकडून तसा आदेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे नोंदणीच्या ठिकाणी एकच गोंधळ पाहायला मिळाला. पोलीसही घटनास्थळी दाखल झालेत. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे एकीकडे हरभऱ्याला योग्य दर मिळावा, यासाठी भरउन्हात शेतकरी उभे आहेत. तर दुसरीकडे पोलीस मात्र त्यांच्यावर लाठीचार्ज करताना पाहायला मिळत आहेत. धामणगावमध्येही नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.
Published on: Feb 27, 2023 01:26 PM