अमरावतीत शिवसेनेला मोठा धक्का; जिल्हाप्रमुख राजेश वानखडे भाजपमध्ये प्रवेश करणार

| Updated on: Sep 08, 2022 | 10:46 AM

शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसतच आहेत. आज पुन्हा एकदा अमरावतीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

अमरावती : शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसतच आहेत. आज पुन्हा एकदा अमरावतीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वानखडेंनी तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

Published on: Sep 08, 2022 10:46 AM
कोकणात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट ; मुसळधार पावसाची शक्यता
औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणांची छापेमारी