उद्धव ठाकरेंचं आता नाव बदललंय, भाईजान केलंय; कुणी केली टीका?
Navneet Rana on Uddhav Thackeray : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. . छत्रपती संभाजीनगरमध्ये भाईजान उद्धव ठाकरेंनी सभा घेतली, असं त्या म्हणाल्या आहेत.
अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंचं नाव आता बदललेलं आहे. भाईजान उद्धव ठाकरे नाव झालेलं आहे”, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. हनुमान चालीसा वाचायचं म्हटल्यावर डोक्यात विचार येते की बाबा पुन्हा आतमध्ये तर टाकणार तर नाही ना? मागील वर्षी हनुमान चालीसा नाव घेतल्यानंतर 33 महिन्याच्या सरकारने मला जेलमध्ये टाकलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाईजान उद्धव ठाकरेंनी सभा घेतली आहे. यावर्षी सामूहिक हनुमान चालिसा पठण होणार आहे. उद्धव ठाकरेंचं नाव आता बदललेल आहे भाईजान उद्धव ठाकरे नाव झालेलं आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
Published on: Apr 03, 2023 09:36 AM