मविआत तारतम्यच नाही, त्यामुळे वज्रमुठीतील एक-एक बोट उघडायला लागलंय; कुणाचा घणाघात?
Amravati News : महाविकास आघाडीची नागपुरात उद्या वज्रमूठ सभा होतेय. महाविकास आघाडीच्या या सभेवर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी टीका केली आहे. पाहा व्हीडिओ...
अमरावती : महाविकास आघाडीची नागपुरात उद्या वज्रमूठ सभा होतेय. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीच्या या सभेवर टीका केली आहे. महाविकास आघाडीतच तारतम्य नाही. त्यामुळे वज्रमुठीतील एक-एक बोट उघडायला लागलेलं आहे, असं वाटतं, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत. वर्तमान पत्रातून वाचायला मिळतं नितीन राऊत नाराज आहेत. नाना पटोले 20-22 तारखेला राहुल गांधींना सभेसाठी बोलावणार आहेत. पण काँग्रेसमधील अनेक लोकच या सभेपासून स्वतःला दूर ठेवत आहेत, असंही अनिल बोंडे म्हणाले आहेत. जशी शिवसेनेलाच गरज पडली आहे एका हाताने ते काँग्रेसला सांभाळत आहे. एका हाताने राष्ट्रवादीला सांभाळत आहे आणि स्वतःचा अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी संजय राऊत धडपड करत आहे, असा टोलाही अनिल बोंडे यांनी लगावला आहे.
Published on: Apr 15, 2023 02:37 PM