राष्ट्रवादीत नेत्यांचे दोन गट; ‘या’ दोन नेत्याचं नाव घेत बच्चू कडू यांचा राष्ट्रवादीवर निशाणा

| Updated on: Apr 30, 2023 | 2:41 PM

Bacchu Kadu On Jayant Patil : तेव्हा मुख्यमंत्रिपद तर सोडाच पण विरोधी पक्षनेतेपदही...; बच्चू कडू यांचं राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीवर भाष्य

अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी जयंत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत. एका गट अजित पवार यांचा आहे तर दुसरा गट जयंत पाटील यांचा आहे. राष्ट्रवादी पक्षाची दोन गटात विभागणी झाली आहे. पण पक्ष एकत्र राहण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत आहे, असं बच्चू कडू म्हणालेत. राष्ट्रवादी पक्षात जर गटबाजी राहली तर मुख्यमंत्री तर सोडाच विरोधी पक्षनेतेपदही राहणार नाही, असंही ते म्हणाले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीवरही ते बोललेत. इतर चार पक्ष विरुद्ध प्रहार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढत आहे. तरीही आम्हाला यश मिळेल. अनेक ठिकाणी काँग्रेस निवडणूक आली. त्याला भाजपचाही पाठिंबा आहे. पण आम्ही आमच्या बळावर निवडून आलो आहोत, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

Published on: Apr 30, 2023 02:40 PM
MPSC परिक्षेचा गोंधळ संपता संपेना, आता ‘या’ कारणामुळे विद्यार्थी हैराण
निवडणुकीच्या मतपेटीत सापडल्या चिठ्ठ्या, गुवाहाटी ते ईडीपर्यंत सगळ्याचा उल्लेख; कुठं घडला प्रकार?