रवी राणा यांचे मोठे बंधू सुनील राणा यांचा पराभव; पाहा व्हीडिओ…

| Updated on: Apr 29, 2023 | 2:33 PM

Amravati Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : रवी राणा यांना धक्का; मोठे बंधू सुनील राणा यांचा पराभव

अमरावती : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतमोजणी पूर्ण झाली आहे. अमरावती बाजार समिती निवडणुकीत आमदार रवी राणा यांना मोठा धक्का बसलाय. यात आमदार रवी राणा यांचे मोठे भाऊ सुनील राणा यांचा पराभव झाला आहे. रवी राणांच्या शेतकरी पॅनलचाही सुपडासाफ झाला आहे. आमदार यशोमती ठाकूर आणि महाविकास आघाडी यांच्या गटाचा 18 पैकी 18 जागा विजय झाला आहे.
रवी राणांच्या पॅनल विरुद्ध यशोमती ठाकूर यांच्या पॅनलमध्ये थेट लढत झाली. अमरावती जिल्ह्यातील 6 कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी 5 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. पाच पैकी चार कृषि उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा याआधी झेंडा आहे.

Published on: Apr 29, 2023 02:33 PM
चालायची ताकद नसणाऱ्यांनी पळायची भाषा करू नये; नारायण राणे यांची ठाकरे, राऊतांवर टीका
‘नुकसान भरपाई कधी मिळणार?’ चिंताग्रस्त संत्रा उत्पादकांचा सरकारला थेट सवाल