आज हनुमान जन्मोत्सव, खासदार नवनीत राणा 21 वेळा हनुमान चालिसा पठण करणार

| Updated on: Apr 06, 2023 | 9:27 AM

Hanuman Janmotsav 2023 : आज हनुमान जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज हनुमान चालिसा पठण करणार आहेत. पाहा व्हीडिओ...

अमरावती : आज हनुमान जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज हनुमान चालिसा पठण करणार आहेत. यावेळी त्यांच्या हजारो हनुमान भक्तही हनुमान चालिसा पठण करणार आहेत. नवनीत राणा 21 वेळा सामुहिक हनुमान चालीसा पठण करणार आहेत. आज खासदार नवनीत राणा यांचा वाढदिवसही आहे. अमरावतीच्या बडनेरा मार्गावरील खंडेलवाल लॉनमध्ये भव्य हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक हनुमान मंदिरातील ट्रस्टच्या 11 सदस्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. हनुमान चालीसा कार्यक्रमाच्या बॅनरवर ‘हिंदू शेरणी’ असा नवनीत राणांचा उल्लेख करण्यात आला आहे. 111 फूट हनुमानाची उंच मूर्ती उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी 15 एकरवर मोठं उद्यान साकारण्यात येणार आहे.

Published on: Apr 06, 2023 09:27 AM
आम्हाला आरोप करायची गरज नाही; पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकार सुनावलं
भाजपच्या चवन्न्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय?; सामनातून टीका