नागपुरात आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा; कोण-कोण उपस्थित राहणार?

| Updated on: Apr 16, 2023 | 7:41 AM

Nagpur Mahavikas Aghadi Vajramuth Sabha : कोण कोण भाषण करणार याची देखील आमची सिस्टीम ठरलेली आहे. अजितदादांच्या कार्यालयात बसून कार्यक्रम ठरवलेला आहे. तारखादेखील अजितदादांनीच सजेस्ट केलेल्या आहेत. त्यामुळे अजितदादा या सभेला जरूर येतील, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे.

अमरावती : नागपुरात आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे.या वज्रमूठ सभेची मविआकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही सभा कशी होणार? या सभेला कोण-कोण उपस्थित राहणार? याविषयी शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे. वज्रमूठ सभा ही महाविकास आघाडीची आहे. उद्धव ठाकरे या सभेला येणार आहेत. कोणत्या पक्षाच्या वतीने कोणते नेते येतील, हा त्यांचा पक्ष ठरवत असतो. सभा ही महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची आहे.कोणत्या नेत्याची सभा नाही त्यामुळे कोण येतील कोण नाही हे त्यांचे त्यांचे पक्ष ठरवतात. अजितदादांनीच हा कार्यक्रम ठरवलेला आहे. त्यामुळे अजितदादा ही या सभेला येतील, असं दानवे म्हणाले आहेत.

Published on: Apr 16, 2023 07:38 AM
मेट्रोच्या जमिनीचा वाद शिगेला; भाजप-शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शाह यांच्या हस्ते आज ‘महाराष्ट्र भूषण’, जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी