अमरावती : अमरावती जिल्ह्यातील एसटीच्या 50 फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यात लांब, मध्यम फेऱ्यांचा समावेश् आहे. त्यामुळे महिन्याकाठी एस टी महामंडळाला तब्बल स्वव्वा कोटींचा फटका बसत आहे. प्रवाशांचीही गैरसोयला होतेय. या निर्णयामुळे दररोज पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास रद्द झाला आहे. 405 पैकी 361 बस अमरावती एसटी विभागाकडे आहेगत. अमरावती विभागातील 104 एसटी बस एक्सपायर झाल्या आहेत. मागील दोन वर्षापासून लांब पल्याच्या 21 मध्यम आणि मध्यम पल्ल्याच्या 29 बस फेऱ्या अशा 50 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसाला पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास कमी झाला आहे.