टायर फुटलाच नाही मग बुलढाणा बस अपघाताचे नेमकं कारण काय? आरटीओच्या अहवाल काय झालं उघड?

| Updated on: Jul 01, 2023 | 2:53 PM

सिंदखेडराजा परिसरात पिंपळखुटा येथे झाला. तर त्यात 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना बसचं टायर आणि डिझेलची टाकी फुटल्याने आग लागली आणि त्यातच 25 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. पण आता आरटीओच्या अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. हा सिंदखेडराजा परिसरात पिंपळखुटा येथे झाला. तर त्यात 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना बसचं टायर आणि डिझेलची टाकी फुटल्याने आग लागली आणि त्यातच 25 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. पण आता आरटीओच्या अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालात आणि ड्रायव्हरने दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार टायर फुटून भीषण अपघात झाला. मात्र आरटीओनं दिलेल्या अहवालात टायर फुटलाच नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आता हा अपघात नेमका कशामुळे झाला असा प्रश्न आता सगळ्याच्यांच मनात आला आहे. तर हा अपघात चालकाला डुलकी लागल्याने झाला असेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Published on: Jul 01, 2023 02:53 PM
‘समृध्दी महामार्गावर भीषण अपघात नाही, तर प्रवाशांची हत्या’, शिंदे-फडणवीस यांच्यावर कोणी केली टीका?
‘…बसचा कोळसा झाला; आई – वडिलांची पुण्याई म्हणूनच’; अपघातातून बचावलेल्या योगेश गवईची कहाणी