अमरावतीत आजपासून दंगल; दोन दिवसीय विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात…

| Updated on: Feb 25, 2023 | 10:04 AM

आजपासून दोन दिवसीय विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याकडे विदर्भाचं लक्ष लागलंय...

अमरावती : अमरावतीत आजपासून दंगल सुरु होतेय. आजपासून दोन दिवसीय विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या विदर्भ केसरीसाठी विदर्भातील नामांकीत 175 दिग्गज मल्ल अमरावतीत दाखल झालेत. महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. 1996 नंतर प्रथमच अमरावतीत ही स्पर्धा होत आहे. विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून सुरूवात होतेय. या कुस्ती स्पर्धेसाठी लाखोंची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ही स्पर्धा कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Published on: Feb 25, 2023 10:00 AM
अंबादासजी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या!; नामांतरावरून दावनेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर
होय मी गद्दारी केली!, फक्त ‘या’ कारणासाठी; मंत्री गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य