देवेंद्रजी, आता तुमच्या सरकारला दुप्पट वेगाने काम करावं लागेल- अमृता फडणवीस
ज्या दिवसांपासून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले आहे, त्यादिवसांपासून हे सरकार चर्चेत आले आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून नेहमीच चर्चेत असलेले हे शिंदे सरकार (Shinde-Fadnavis Government) आता मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, कारण मंत्रिमंडळाचा (Cabinet expansion) झालेला विस्तार आणि त्या विस्तारामध्ये महिलांना स्थान देण्यात आले नसल्याने विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच त्यावर झोड उठवली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री […]
ज्या दिवसांपासून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले आहे, त्यादिवसांपासून हे सरकार चर्चेत आले आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून नेहमीच चर्चेत असलेले हे शिंदे सरकार (Shinde-Fadnavis Government) आता मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, कारण मंत्रिमंडळाचा (Cabinet expansion) झालेला विस्तार आणि त्या विस्तारामध्ये महिलांना स्थान देण्यात आले नसल्याने विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच त्यावर झोड उठवली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी विरोधकांचीच री ओढत त्यांनी क्षेत्र कोणतंही असो महिलांना स्थान हे दिलच पाहिजे अशा टिप्पणी त्यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला हे एक प्रकारे घरचेच आहेर मिळाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारला आता दुप्पट वेगाने काम करावं लागेल, असंही त्या म्हणाल्या आहेत.