राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवार यांच्यावर नाराज; महिला कार्यकर्ती म्हणाली, ‘वन अँड वन ओनली…’

| Updated on: Jul 05, 2023 | 2:42 PM

वन अँड वन ओनली... शरद पवार, अभी टायगर जिंदा है असा इशाराच अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना दिला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आतापर्यंत कार्यकर्त्यांसमोर असा पेच कधीच निर्माण झाला नाही. फक्त अजित पवार यांनी बंड केलं आणि पक्षात उभी फूट पडली. यावरून सामान्य कार्यकर्ता आता चांगलाच आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांकडून आता यावरून अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर टीका होत आहे. तर याच दरम्यान या सगळ्यामागे भाजपचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही दिवसापुर्वीच्या इशाऱ्याचा हात असल्याचा दावा देखील कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. यावेळी एका महिला कार्यकर्तीनं आपण फक्त शरद पवार यांच्यासाठी येथे आलो आहेत. म्हणताना, वन अँड वन ओनली… शरद पवार, अभी टायगर जिंदा है असा इशाराच अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना दिला आहे.

Published on: Jul 05, 2023 02:42 PM
राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी रोहित पवार यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “शरद पवार यांचा अनुभव…”
“राज ठाकरे कॉमेडी माणूस, लोकांची करमणूक करण्यासाठी ते बोलतात”, कोणी केली टीका?