केजरीवाल यांच्या अरोपाने बैठकीतच खडाजंगी; ओमर अब्दुल्ला ही भडकले; काय झालं नेमकं?
मात्र या बैठकीतच एकमत होण्याआधीच त्यांच्यातील मतभेद ही समोर आले. येथे बैठकीत अरविंद केजरीवाल आणि ओमर अब्दुल्ला यांच्यात खडाजंगी झाली, यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी दोंघाची समजूत काढली.
पटना : पाटण्यात झालेल्या विरोधकांच्या बैठकीत भाजपच्या विरोधात विरोधकांचे एकमत झाले आहे. मात्र या बैठकीतच एकमत होण्याआधीच त्यांच्यातील मतभेद ही समोर आले. येथे बैठकीत अरविंद केजरीवाल आणि ओमर अब्दुल्ला यांच्यात खडाजंगी झाली, यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी दोंघाची समजूत काढली. यावेळी ‘आप’ने काँग्रेसवर मोठा आरोप करताना, केंद्राच्या अध्यायदेशावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये समझोता झाल्याचे म्हणण्यात आलं होतं. यावरून ओमर अब्दुल्ला यांनी पलटवार करताना 370 कलम हटवलं त्यावेळी आपकडून काहीच बोलण्यात आलं नाही असं म्हटलं. या मुद्द्यांवरूनच वाद झाला.
Published on: Jun 24, 2023 07:19 AM