Earthquake : लोकांच्या मनात चक्रीवादळाची भीती कायम असतानाच ‘या’ शहरात भूकंपाचे धक्के

| Updated on: Jun 15, 2023 | 7:11 AM

भारतीय हवामानशास्र विभागाने ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सौराष्ट्र, द्वारका आणि कच्छ किनारपट्टीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.

कच्छ : अरबी समुद्रात सध्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ घोंघावत आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच लोकांच्या मनात चक्रीवादळाची भीती कायम असतानाच येथे काल भूकंपाचे धक्के बसले. येथे बुधवारी 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.

गांधीनगर येथील भूकंपशास्त्र संशोधन संस्थानं जारी केलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छ जिल्ह्यातील बछाऊपासून पश्चिम-नैऋत्य दिशेला 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर बुधवारी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी भूकंपाचे धक्के लोकांना जाणवले. आतापर्यंत पडझड किंवा जीवितहानीबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

याचदरम्यान भारतीय हवामानशास्र विभागाने ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सौराष्ट्र, द्वारका आणि कच्छ किनारपट्टीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Published on: Jun 15, 2023 07:11 AM
असाही वारकरी; पोलिओमुळे अपंगत्व, तरी 11 वर्षांपासून करतायत पंढरीची वारी
“बेडूक कितीही…” या अनिल बोंडे यांच्या टीकास्रावर भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?