राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, भोंग्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत भूमिका घेतल्याने राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगत आहे. यातच आता भोंग्यावरून साप्रदायिक वाद निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत भूमिका घेतल्याने राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगत आहे. यातच आता भोंग्यावरून साप्रदायिक वाद निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य मंत्रमंडळाची आज एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत भोंग्याबाबत असलेल्या नियमावलीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 20, 2022 09:27 AM