Superfast 50 | मुंबईत पावसाची रिपरिप सुरू, पुणे, कोकण, विदर्भाला अलर्ट, मात्र पुणे करांच्या चिंतेचं कारण काय?
कोकणातील अनेक भागात सध्या पावसाची जोरदार बँटिंग पाहायला मिळत आहे. मात्र राज्याच्या इतर भागात पाऊस नसल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत.
मुंबई, 18 जुलै 2023 | राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाने हजेरी लावायला सुरूवात केली आहे. कोकणातील अनेक भागात सध्या पावसाची जोरदार बँटिंग पाहायला मिळत आहे. मात्र राज्याच्या इतर भागात पाऊस नसल्याने पेरण्या रखडलेल्या आहेत. याचदरम्यान राज्यातील ३ जिल्ह्यांना अतिमुसळधार तर १५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर हा इशारा ३१ जुलैपर्यंतचा आहे. यासह हवामान विभागाकडून पुणे, विदर्भ आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट देखील बजावण्यात आला आहे. तर आठवडाभर पावसाचा जोर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकिकडे हवामान विभागाने पुणेसाठी ऑरेंज अलर्ट दिला असला तरी मात्र पुणेसह पिंपरीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण खडकवासला प्रकल्पात ३१ टक्के तर पनवा धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी जलसाठा शिल्लक राहिला आहे. जर पावसाने दडी मारली तर पुणेसह पिंपरीकरांच्या पाण्याचा प्रश्न उद्धभवण्याची शक्यता आहे. यासह घ्या बातम्यांचा सुपरफास्ट 50 मध्ये आढावा