ठाण्यातील आनंद आश्रम आता ‘या’ नावाने ओळखला जाणार, शिंदे गटाकडून नवे नामकरण
स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रममध्ये आनंद दिघे यांच्या फोटोला फुलांनी सजवण्यात आले आहे. याच आनंद आश्रममध्ये आनंद दिघे यांनी शिवसेना मोठी केली.
मुंबई : मंत्रालयासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm eknath shinde ) यांच्या गटाचे कार्यालय उघडण्यात आले असून त्याला बाळासाहेब भवन ( balasaheb bhavan ) असे नाव देण्यात आले आहे. याच भवनातून शिंदे गटाचे कामकाज होत आहे. तर, दादर येथे शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय सुरु करण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रम ( anand ashram ) याचे नाव बदलले आहे.
स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रममध्ये आनंद दिघे यांच्या फोटोला फुलांनी सजवण्यात आले आहे. याच आनंद आश्रममध्ये आनंद दिघे यांनी शिवसेना मोठी केली. त्यांच्याच तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. पण, याच आनंद आश्रमचे नाव शिंदे गटाकडून बदलण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना आनंद आश्रम, एकनाथ शिंदे असे नवे नामकरण आनंद आश्रमचे करण्यात आले आहे.