कबरीवर फुलं वाहण्याच्या आंबेडकर यांच्या कृतीवर हिंदू महासंघ आक्रमक; केली सरकारकडे ही मागणी

| Updated on: Jun 18, 2023 | 9:32 AM

आता नव्या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधीस्थळाला भेट दिली. कबरीवर फुलं वाहिली. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

पुणे : राज्यात औरंगजेबाच्या फोटो आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवरून आधीच वारावरण तंग बनलेलं आहे. याचदरम्यान आता नव्या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधीस्थळाला भेट दिली. कबरीवर फुलं वाहिली. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यावरून शिंदे गटाकडून टीका करण्यात आली असून आता या प्रकरणावरून हिंदू महासंघाकडूनही टीका केली जात आहे. हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी याप्रकरणी आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर त्यांच्या या कृतीने शिवभक्त दुखावले आहेत असेही त्यांनी म्हटलं आहे. तर शिवभक्तांच्या शिवभक्तीलाच आंबेडकर यांनी आव्हानच दिले असे हिंदू महासंघ मानतो असेही ते म्हणालेत.

Published on: Jun 18, 2023 09:32 AM
“…म्हणून केसरकरांनी मला ऑफर दिली असेल” : ‘तो’ किस्सा सांगत अजित पवारांची प्रतिक्रिया
प्रकाश आंबेडकर औरंग्याच्या कबरीवर झुकले; ठाकरे सहमत आहेत का? भाजप नेत्याचा सवाल