Video : मिटकरी, भुजबळ आणि पुरंदरेंविषयीची भूमिका शरद पवारांनी जाहीर करावी- आनंद दवे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अमोल मिटकरी, छगन भुजबळ आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी भूमिका जाहीर करावी. आम्ही पत्रकार परिषदेनंतर त्यांचा जाऊन सत्कार करू, असे वक्तव्य ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. शरद पवार यांनी संध्याकाळी ब्राह्मण समाजाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ब्राह्मण महासंघ सहभागी होणार नाही, […]
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अमोल मिटकरी, छगन भुजबळ आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी भूमिका जाहीर करावी. आम्ही पत्रकार परिषदेनंतर त्यांचा जाऊन सत्कार करू, असे वक्तव्य ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. शरद पवार यांनी संध्याकाळी ब्राह्मण समाजाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ब्राह्मण महासंघ सहभागी होणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. कारण फक्त चर्चा होणार आहे. तर अमोल मिटकरींची त्यांनी आज कान उघाडणी करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने (Brahman Mahasangh) केली आहे. पवार साहेबांना ब्राह्मण समाजाच्या वेदना माहिती आहेत, त्यामुळे त्यांच्यावर नाराजी नाही, मात्र पक्षातील काही नेत्यांची त्यांनी कानउघडणी करावी, अशी अपेक्षा दवे यांनी व्यक्त केली आहे.
Published on: May 21, 2022 04:36 PM