दीपक केसरकर यांच्या ‘त्या’ दाव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याचा सल्ला; म्हणाला, “मुख्यमंत्र्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जावं”
दोन दिवसापूर्वी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात खळबळजनवक वक्तव्य केलं होतं. बंड यशस्वी झाला नसता, तर शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
ठाणे : दोन दिवसापूर्वी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात खळबळजनवक वक्तव्य केलं होतं. बंड यशस्वी झाला नसता, तर शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनावर प्रचंड दबाव असेल कारण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे नरेश म्हस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार करून” घेण्याचा सल्ला आनंद परांजपे यांनी दिला आहे. “एक ठाणेकर म्हणून मला मुख्यमंत्री यांची काळजी वाटत आहे, त्यामुळे मी एवढचं सांगेन गेट वेल सून,” असा खोचक टोला आनंद परांजपे यांनी लगावला.
Published on: Jun 23, 2023 01:23 PM