अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याचा राजेशाही थाट, अनेक दिग्गज हजर
अनंत अंबानी ( anant ambani ) याचा साखरपुडा 'अँटिलिया' निवासस्थानी अत्यंत राजेशाही थाटात नुकताच पार पडला.
मुंबई : रिलायन्सचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी ( mukesh ambani ) आणि नीता अंबानी ( nita ambani ) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी ( anant ambani ) याचा साखरपुडा त्यांच्या ‘अँटिलिया’ ( antiliya ) या निवासस्थानी अत्यंत राजेशाही थाटात नुकताच पार पडला. या प्रसंगी अनेक दिग्गज नेते आणि सिने क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अनंत अंबानीचा साखरपुडा राधिका मर्चंट हिच्याशी झाला. या साखरपुड्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. गोल धना आणि चुनरी विधी या पारंपारिक पद्धतीने संपन्न झालेल्या या सोहळ्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी एकमेकांना अंगठीची देवाणघेवाण केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या साखरपुडा सोहळ्याला हजेरी लावली. साखरपुड्याच्या निमित्ताने अँटिलिया रोषणाईने उजळले होते. मुकेश अंबानी, नीता अंबानी यांच्यासह मुलगी ईशा अंबानी, जावई आनंद पिरामलही, मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका हे कुटूंब या सोहळ्यात सहभागी झाले होते.