गद्दारांना धूळ चारल्याशिवाय शांत बसणार नाही; गितेंचा रत्नागिरीत जोरदार हल्लाबोल
अनंत गिते यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गटाविरोधात राज्यातील जनतेला चीड आहे. गद्दारांना धूळ चारल्याशिवाय शांत बसणार नाही, असं गिते यांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी : आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. मंत्री उदय सामंत ( यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा हा दौरा आहे. या दौऱ्यात बोलताना शिवसेना नेते अनंत गिते (Anant Gite) यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गटाविरोधात राज्यातील जनतेला चीड आहे. गद्दारांना धूळ चारल्याशिवाय शांत बसणार नाही, असं गिते यांनी म्हटलं आहे. दरम्यान ‘गद्दारांच्या टिंब टिंबवर मोजून 50 हाणा’ हे गाणं लिहिणाऱ्या कवीचे अभिनंदन करतो असं देखील यावेळी गिते म्हणाले आहेत. अदित्य ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीमध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा हा दौरा आहे.