महायुतीत तणावाचं वातावरण? भाजप नेत्याची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका; “बेडूक कितीही फुगला तरी…”

| Updated on: Jun 14, 2023 | 2:42 PM

शिवसेनेच्या जाहिरातीवरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. बोंडेंनी शिंदेसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमरावती : शिवसेनेच्या जाहिरातीवरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. बोंडेंनी शिंदेसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “बेडूक कितीही फुगला तरी हत्ती थोडी बननणार आहे. एकनाथजी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टी, जनतेनं त्यांना स्वीकारलं आहे. पण त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. उद्धव ठाकरे यांना वाटत होतं की मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आहे.आता एकनाथजी शिंदेंना वाटायला लागलं आहे की, ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आहे,” असं बोंडे यांनी म्हटलं आहे.दरम्यान या विधानावरुन शिंदे गट आणि भाजपामधील तणाव वाढला आहे.

Published on: Jun 14, 2023 02:42 PM
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर राऊत यांचा खळबळजनक आरोप; झाकीर नाईकचा विषय काय?
‘…ते मी भविष्यात उघड करेल’, मुख्यमंत्र्यांच्या काश्मीर दौऱ्यावर संजय राऊत यांचा इशारा