एकनाथ शिंदेंवर संशय घेणं शिवसेनेला भोवणार – अनिल बोंडे

| Updated on: Jun 21, 2022 | 10:10 AM

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे काल सायंकाळपासून नॉटरिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर संशय घेणं शिवसेनेला भोवणार असल्याची प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली आहे.

काल विधानपरिषद निवडणुकीचा निकाला लागला. यामध्ये भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे तेरा आमदारांसह नॉटरिचेबल आहेत. ते सुरतमधील एका हॉटेलमध्ये आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर संशय घेणं शिवसेनेला भोवण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली आहे.

Published on: Jun 21, 2022 10:10 AM
एकनाथ शिंदेंचा गुजरातला जाण्याचा प्लॅन कालच ठरला?
Bhai Jagtap | काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी आमचा संपर्क : भाई जगताप