कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस उमेदवार आघाडीवर; ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, पाहा…
पुणे कसबा पोटनिवडणूक आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सध्या होतेय. या मतमोजणीवर ठाकरेकगटाचे नेते अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
नवी दिल्ली : पुणे कसबा पोटनिवडणूक आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सध्या होतेय. या मतमोजणीवर ठाकरेकगटाचे नेते अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यातील पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होतेय. कसबा निवडणुकीतून परिवर्तन दिसतंय. भाजपनं पोकळ आश्वासनं दिली. मात्र ही आश्वासनं पाळली जात नाहीत. महागाई कंबरडं मोडलंय. त्यामुळे मतदार नाराज आहे. शेतकरी निराश आहेत. उद्योग राज्यातून बाहेर जाताहेत. या सगळ्याचा परिणाम या निवडणुकीत निश्चितपणे दिसेल”, असं अनिल देसाई म्हणालेत.
Published on: Mar 02, 2023 10:48 AM