सत्तासंघर्षावर आज सुनावणी, याचिकांबाबत अनिल देसाई म्हणाले….
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. या सुनावणीसाठी शिवेसेनेचे नेते दिल्लीत दाखल झालेत. अनिल देसाई माध्यमांशी बातचित केली. काय म्हणाले? पाहा...
संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणीसाठी शिवेसेनेचे नेते दिल्लीत दाखल झालेत. अनिल देसाई, सुभाष देसाई, अरविंद सावंत सुनावणीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. सध्या ते सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने जात आहेत. यावेळी अनिल देसाई माध्यमांशी बातचित केली. सगळ्याच याचिका महत्वाच्या आणि एकमेकांशी सलग्न आहेत. या सगळ्यात सत्याचा विजय होईल आणि आम्हाला न्याय मिळेल, असं अनिल देसाई (Anil Desai) म्हणालेत.
Published on: Sep 27, 2022 10:11 AM