राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी; न्यायालयात काय होणार? अनिल देसाई यांनी सविस्तर सांगितलं…

| Updated on: Mar 01, 2023 | 10:31 AM

मंत्रिमंडळ विस्तारावर अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत नाही, मंत्रिमंडळ विस्तार हा प्रश्न त्यांचा आहे", असं ते म्हणालेत.

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतेय. यावर शिवसेनेचे नेते, खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजचा आणि उद्याचा दिवस या सगळ्या सत्तापेचावर सुनावणी होणार आहे. उद्या आमचा रिजोइंडिर युक्तिवाद होईल. उद्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद संपतील. राज्यपालांच्या पत्रावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. नार्वेकर यांची निवड झाल्यावर तिथं संख्याबळ महत्वाचे होतं. 39 आमदारांनी प्रभू यांचा व्हीप झुगारला. संसदेतील व्हीपबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली आहेत. या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो निकाल काय येतो पाहणं महत्वाचं आहे”, असं अनिल देसाई म्हणालेत. आज महागाई वाढत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा सर्वसामान्यांना दिलासा देणं हे सरकारचं काम आहे. ते आधी करावं, असं देसाई म्हणालेत.

Published on: Mar 01, 2023 10:25 AM
शंकरपटात दरम्यान अपघात; काळाजाचा ठोका चुकवणारा व्हीडिओ… मालक अन् बैलजोडी…
‘ती’ याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने भाजपला चपराक लगावलीये; सामनातून टीकास्त्र