Anil Desai : शिवसेना हा पक्ष कधी संपत नाही, तो एक विचार, खासदार अनिल देसाई
'गेल्या काही वर्षापासून त्यांच्या कर्तुत्वाने जगाला वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. शिवसेना हा पक्ष कधी संपत नाही, तो एक विचार आहे,' असं खासदार अनिल देसाई म्हणालेत.
मुंबई : ‘ठाकरे यांची ओळख नावाने तर आहेच पण गेल्या काही वर्षापासून त्यांच्या कर्तुत्वाने जगाला वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. शिवसेना हा पक्ष कधी संपत नाही, तो एक विचार आहे,’ असं खासदार अनिल देसाई म्हणालेत. आता बंडखोर आमदार हे आपले पाप लपवून ठेवण्यासाठी अशी टिका करीत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा झंजावत दौरा सबंध महाराष्ट्र पाहत आहेत. त्यामुळे त्यांना ओळख करुन द्यायची गरज नाही पण आपले अस्तित्व काय आहे? याचा जरा विचार (Tanaji Sawant) तानाजी सावंत यांनी करावा असा टोला (Shiv sena) शिवसेनेचे अनिल देसाई यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरेंच काम फक्त मुंबईनं नाही तर जगानं पाहिलंय असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टिका केली आहे. तर आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातु असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
Published on: Aug 02, 2022 12:24 PM