Special Report | Anil Deshmukh जेलमध्ये कोसळले

Special Report | Anil Deshmukh जेलमध्ये कोसळले

| Updated on: Aug 27, 2022 | 1:50 AM

मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांवर ईडीनं कारवाई केलीय. न्यायालयीन कोठडीमुळं जेव्हा आर्थर रोड जेलमध्ये गेले. त्यावेळी देशमुखांची तब्येत चांगली होती. मात्र आता तब्येत बिघडलीय.

मुंबई : देशमुख न्यायालयीन कोठडीत, मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. मात्र दुपारी देशमुखांच्या छातीत अचानक दुखू लागलं आणि चक्कर येऊन ते जेलच्या बराकमध्ये कोसळले. त्यानंतर देशमुखांना पोलिसांनी तात्काळ जे जे रुग्णालयात आणलं. जेजे हॉस्पिटलनं एक प्रेस नोट प्रसिद्ध करुन म्हटलंय की, अनिल देशमुख यांना छातीत दुखणे, आणि चक्कर येणे या तक्रारीमुळं दुपारी 2 वाजता हॉस्पिटलमध्ये आणलं. सध्या स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तपासण्या आणि उपचार सुरु आहेत. 4 महिन्यांआधीही, अनिल देशमुखांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना जेजे हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. त्याही वेळी देशमुख व्हील चेअरवरच बसलेले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांवर ईडीनं कारवाई केलीय. न्यायालयीन कोठडीमुळं जेव्हा आर्थर रोड जेलमध्ये गेले. त्यावेळी देशमुखांची तब्येत चांगली होती. मात्र आता तब्येत बिघडलीय.

Published on: Aug 27, 2022 01:50 AM
Anil Deshmukh आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले
Special Report | शिवसेना- संभाजी ब्रिगेडची युती, मविआचं काय?