“शिवसेनेची जाहिरात हास्यास्पद, स्वतःच्या एजन्सीकडून स्वतःचीच पाठ थोपटण्याचा प्रकार”, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. आता या जाहिरातीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "स्वतःच एजन्सीकडून स्वतःची पाठ थोपटण्याचा प्रकार आहे, अशी जाहिरात हास्यास्पद आहे.
नागपूर: शिवसेनेच्या जाहिरातीवरुन राज्यातील राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. आता या जाहिरातीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “स्वतःच एजन्सीकडून स्वतःची पाठ थोपटण्याचा प्रकार आहे, अशी जाहिरात हास्यास्पद आहे. आज सर्व जनता त्रस्त आहे. बेरोजगारी, शेतकरी, मोठे उद्योग महाराष्ट्रात येणार होते. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम शिंदे करत आहेत. शिंदे यांच्या 40 आमदारांच्या मतदारसंघात जाऊन पाहिले, तर खरी परिस्थिती लक्षात येईल. 40 पैकी 3 ते 4 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाही, अशी परिस्थिती असताना असे सर्व्हे दाखवले जात आहेत. शिंदे यांनी जनतेची दिशाभूल करू नये अशी विनंती करायची आहे. त्यांच्या मित्र पक्षातील फडणवीस यांच्यासाठी हे आव्हान आहे, तिन्ही पक्ष मिळून निवडणुका लढणार आहेत. महाराष्ट्रात पाहिले तर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. प्रतिष्ठित एजन्सीचा सर्व्हे मानायचा असतो”, अशा सर्व्हेला काही महत्व नाही, असे अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.