Anil Deshmukh | अनिल देशमुख यांची सुप्रीम कोर्टात याचिका, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान
अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. (Anil Deshmukh)
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टानं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे आरोप गंभीर असल्याचं म्हटलं होतं. अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई हायकोर्टानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत गेले होते. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव खेदली आहे. सुप्रीम कोर्टात त्यांनी आव्हान याचिका केली.