भाजपचे 100 आमदार अस्वस्थ; काँग्रेस नेत्याचं मोठं विधान; बच्चू कडू याच्याबाबतही केलं सुचक वक्तव्य

| Updated on: Aug 09, 2023 | 3:01 PM

ते युतीत मित्र पक्ष आहेत. मात्र आता ते आपल्याच सरकारच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. शेतकरी, शेतमजूर, वंचित घटक यांच्या विविध प्रश्नावरून कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेकडून अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.

नागपूर, 9 ऑगस्ट 2023 । शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या विरोधात प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आहे. ते युतीत मित्र पक्ष आहेत. मात्र आता ते आपल्याच सरकारच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. शेतकरी, शेतमजूर, वंचित घटक यांच्या विविध प्रश्नावरून कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेकडून अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. तर त्यांना मंत्री पद न मिळाल्याने सरकारवर दबाव वाढवण्यासाठी हे आंदोलन केलं जात असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. याचमुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील टीका केलीय. त्यांनी, मंत्रीपद मिळत नाही हे लक्षात आल्यावर कडू यांचं हे दबाव तंत्र असू शकत अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तर भाजपसह शिंदे गटातील आमदार किती व का नाराज आहेत हे देखील त्यांनी सांगितलं आहे. पाहा काय म्हटलं आहे देशमुख यांनी…

Published on: Aug 09, 2023 02:59 PM
“तुम्ही मणिपूरमध्ये माझ्या भारत मातेची हत्या केली, तुम्ही देशद्रोही आहात”, राहुल गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! चांदणी चौकाच्या उड्डाणपूलासह रस्त्यांचे काम पूर्ण, वाहतूक कोंडीतून सुटका