‘मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाच्या तोंडाला सरकार पानं पुसतयं’; सरकारवर काँग्रेस नेत्याचा घणाघात
२०१६ मध्ये तब्बल ५८ मोर्चे विविध जिल्ह्यात निघाले होते. ज्यातून अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १५ मान्य झाल्या आहेत. तर ११ अजूनही बाकी आहेत. त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे निधालेत.
नागपूर, 9 ऑगस्ट 2023 । मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी विविध मागण्यांसाठी आज मराठा क्रांती मोर्चा मुंबईत धडकला आहे. २०१६ मध्ये तब्बल ५८ मोर्चे विविध जिल्ह्यात निघाले होते. ज्यातून अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १५ मान्य झाल्या आहेत. तर ११ अजूनही बाकी आहेत. त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे निधालेत. त्यांच्याकडून विविध मागण्यांसाठी सरकारचं लक्ष वेधलं जाणार आहे. पण याची दखल सरकारने न घेतल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरावर काळे झेंडे लावू असा इशारा देण्यात आला आहे. यावरून मराठा समाज आता आक्रमक झाल्याचे समोर येत आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाना साधताना, मराठा, ओबीसी, धनगर समाजाला दिलेले आश्वास लवकर पुर्ण करावं अशी मागणी केली आहे. तर राज्य सरकार हे मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाची दिशाभूल करत असून या समाजांच्या तोंडाला पानं पुसतयं अशी टीका केली आहे.