अजित पवार यांची इच्छा, विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा; राष्ट्रवादीचा नेता म्हणतो, “…म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली”

| Updated on: Jun 22, 2023 | 9:34 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत आज कार्यकर्ता मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा. तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी द्या, अशी इच्छा व्यक्त केली. अजित पवार यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत आज कार्यकर्ता मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा. तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी द्या. आपल्याला कोणतीही जबाबदारी मिळाली तरी आपण तिला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असं अजित पवार भर कार्यक्रमात म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजितदादा यांनी आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. शेवटी वरिष्ठ नेते शरद पवार यावर निर्णय घेतील. पुढील काळात निवडणुका आहेत, त्यांना वाटलं असेल मी पक्ष संघटने मध्ये काम करावे,” म्हणून त्यांनी ही इच्छा व्यक्त केली.

Published on: Jun 22, 2023 09:34 AM
“भाजप-शिंदे गटाची ताकद नाही तिथे दंगली”, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
सुप्रिया सुळे यांचा जयंत पाटील यांच्याकडे इशारा? म्हणाल्या, ‘माझा करेक्ट कार्यक्रम केलाय’