खाते वाटपावरून अनिल देशमुख यांचा एकनाथ शिंदे यांना टोला; म्हणाले, “ही धोक्याची घंटा…”
अजित पवार सत्तेत येताच त्यांना मंत्रिमंडळात स्थानही मिळालं आहे. तसंच खातेवाटपात महत्त्वाची खाती मिळाली. यामुळे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमरावती : राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवार आपल्या काही सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार सत्तेत येताच त्यांना मंत्रिमंडळात स्थानही मिळालं आहे. तसंच खातेवाटपात महत्त्वाची खाती मिळाली. यामुळे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “सर्वात महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी पुढील काळासाठी धोक्याची घंटा आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक अनुभवी आहेत. वरिष्ठ मंडळींनी यांना डावलून खातेवाटप केला आहे असे दिसत आहे.”
Published on: Jul 16, 2023 12:57 PM