पक्ष आणि चिन्हावर अनिल देशमुख यांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्याकडे…”
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलं आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करत स्वत:ला नवे राष्ट्रीय अध्यक्षही म्हटले. तसेच राष्ट्रवादी आणि पक्षाच्या चिन्हावर दावा ठोकला आहे.
मुंबई: अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलं आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करत स्वत:ला नवे राष्ट्रीय अध्यक्षही म्हटले. तसेच राष्ट्रवादी आणि पक्षाच्या चिन्हावर दावा ठोकला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या निवडणूक चिन्हावर दावा सांगणारी याचिका दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही आमच्याकडेच राहणार आहे. “
Published on: Jul 06, 2023 12:18 PM