“छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेबांचा अपमान सहन करणार नाही”, अनिल परब यांची राज्य सरकारवर टीका
वांद्रे पूर्वच्या शिवसेनेच्या शाखेवर कारवाई करताना बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या घटनेमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखा पाडण्याचा आदेश देणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला चोप दिला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई: वांद्रे पूर्वच्या शिवसेनेच्या शाखेवर कारवाई करताना बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या घटनेमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखा पाडण्याचा आदेश देणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला चोप दिला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “कालचा मोर्चा हा लोकांच्या प्रश्नांसाठी होता. राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे की, बाळासाहेब , शिवरायांचा अपमान अधिकाऱ्यांनी केला. वारंवार विनंती करून देखील, फोटो आम्हाला काढू दिला नाही. महापुरुषांचा अपमान केला त्यांच्यावर सरकार काय कारवाई करणार ? जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार. महापुरुषांचा अपमान करण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का ?महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, कारवाईला सामोरे जायला तयार आहोत,” असं अनिल परब म्हणाले.