“मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गटामुळे रखडलेली नाही, तर…”; अनिल परब यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले

| Updated on: Aug 04, 2023 | 8:10 AM

अंतिम आठ्वड्यावरील प्रस्तावावर बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ठाकरे गट न्यायालयात गेल्यामुळे महापालिका निवडणूक रखडल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. या आरोपांचे खंडन करत सरकारला धारेवर धरलं.

मुंबई, 04 ऑगस्ट 2023 | अंतिम आठ्वड्यावरील प्रस्तावावर बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ठाकरे गट न्यायालयात गेल्यामुळे महापालिका निवडणूक रखडल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. या आरोपांचे खंडन करत सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले की, शिंदे गट आणि भाजप यांनी शिवसेनेची धास्ती घेतली आहे, त्यामुळेच सरकार निवडणूक घेण्याच हिंमत करत नाही. अनिल परब यांनी ईडी चौकशीवरून देखील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आम्हाला जेलमध्ये टाका पण कुटुंबाला भोगायला लावू नका. जैसे को तैसा हे लक्षात ठेवा, इथेच हिशोब होतो, असं अनिल परब म्हणाले.

 

Published on: Aug 04, 2023 08:10 AM
मुंबईकरांचे हाल! ‘बेस्ट’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, ‘या’ मागण्यांसाठी रस्त्यावर
सातारकरांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावाकडे जाणारी तराफा सेवा पुन्हा