Anil Parab | ‘किरीट सोमय्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही’ : अनिल परब
सोमय्या यांनी परब यांची उलटी गनती सुरू झाल्याचे म्हटलं आहे. तर परब यांनी यात आपला संबंध नाही. याचे कागदपत्रे न्यायालयाकडे दिल्याचे म्हटलं आहे.
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा हादरा बसला असून ठाकरे गटाचे फायर फायटर नेते अनिल परब यांना ईडीने झटका दिला आहे. तसेच परब यांची कोट्यावधीची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीकने परब यांची 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त केली आहे. त्यानंतर अनिल परब यांनी आपली प्रतिक्रीया देताना या संपत्तीशी आपला संबंध नसल्याचे परब यांनी म्हटलं आहे.
तर साई रिसॉर्टच्या परवानग्या घेताना मालक म्हणून अनिल परब यांनी त्यांची माहिती लपवल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. तर जेव्हा कारवाई होईल असे वाटलं त्यावेळी त्यांनी विभास साठे यांच्या नावे सर्व परवानग्या मिळवल्या असा दावाही ईडीने केला आहे.
ग्रामपंचायत आणि सरकारची फसवणूक करून परवानग्या इतराच्या नावाने घेण्याचे काम परब यांनी केल्याचेही ईडीने म्हटलं आहे. तर सोमय्या यांनी परब यांची उलटी गनती सुरू झाल्याचे म्हटलं आहे. तर परब यांनी यात आपला संबंध नाही. याचे कागदपत्रे न्यायालयाकडे दिल्याचे म्हटलं आहे.