“…तर महाराष्ट्रात उद्योग येणार नाहीत”, कोल्हापूर प्रकरणी ठाकरे गटाची प्रतिक्रिया
एका आक्षेपाहार्य स्टेट्सवरून कोल्हापुरात आज तणावपूर्वक वातावरण पाहायला मिळालं. या संपूर्ण घटनेवर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. "गेल्या 10 महिन्यांपासून वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्राचा विकास थांबू शकतो. कारण जे गुंतवणूकदार महाराष्ट्रात उद्योग आणू इच्छितात ते आणणार नाहीत.
मुंबई: एका आक्षेपाहार्य स्टेट्सवरून कोल्हापुरात आज तणावपूर्वक वातावरण पाहायला मिळालं. या संपूर्ण घटनेवर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. “गेल्या 10 महिन्यांपासून वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्राचा विकास थांबू शकतो. कारण जे गुंतवणूकदार महाराष्ट्रात उद्योग आणू इच्छितात ते आणणार नाहीत. लोकांचं जिथे लक्ष असलं पाहिजे तिथून हटून दुसरीकडे जात आहे”, असं अनिल परब यांनी सांगितलं.या परिस्थितीत दंगलींना रोखायचं असेल तर विरोधी पक्ष मागे राहणार नाही. विरोधी पक्ष नक्की पुढे येईल. पण या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे व्हायला पाहिजे. जे या सगळ्याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक शिक्षा व्हायला हवी”, अशी भूमिका ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मांडली. तसेच या घटनेमागे सूत्रधार कोण आहेत ते शोधले पाहिजेत. जाणूनबुजून असं केलं जातंय का ते शोधलं पाहिजे. जाणूनबुजून असं करत असतील तर त्याची कारणं काय ती शोधली पाहिजे. याला कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का ते शोधलं पाहिजे”, असं अनिल परब म्हणाले.