“अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीश्वरांचीही इच्छा”, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक ट्विट केलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
बुलढाणा, 24 जुलै 2023 | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक ट्विट केलं. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही फक्त अमोल मिटकरी यांची इच्छा नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाची इच्छा आहे. दिल्लीतील अनेक नेत्यांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं. माझीही तीच इच्छा आहे. पण त्यासाठी 145 आमदारांचा आकडा लागतो. तो आकडा आम्ही गाठला तर अजितदादा हेच शंभर टक्के मुख्यमंत्री होतील. पण सध्या तरी आमच्याकडे हा आकडा नाही. म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठी उभे आहोत. त्यामुळे आमचं सरकार सुरू आहे. माझी इच्छा असण्याचा प्रश्नच नाही. पण दिल्लीतील प्रत्येक नेत्यांना दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं वाटत आहे. आता दिल्लीतील कोणकोणते नेते आहेत, हे मला स्पष्ट करण्याची गरज नाही.”