देवेंद्र फडणवीस यांनी सुनावल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांचा यूटर्न? म्हणाले, “एकनाथ शिंदे आमचे नेते”
अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या विधानावरून मंत्री अनिल पाटील यांनी माघार घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्र्यांची कानउघडणी केल्यानंतर अनिल पाटील यांनी आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असं वक्तव्य केलं आहे.
मुंबई, 26 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु आहे. अशातच मंत्री अनिल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गल्लीतील कार्यकर्त्यांपासून दिल्लीतील नेत्यांपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे, असं अनिल पाटील यांनी म्हटलं होत. त्यांच्या या विधानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कानउघडणी केली. ‘महायुतीतले काही जण वक्तव्य करत आहेत, कनफ्यूजन निर्माण करणं तात्काळ बंद केलं पाहिजे. यातून महायुतीसंदर्भात संभ्रम तयार होतो, या कठोर शब्दात फडणवीस यांनी सुनावलं आहे. यानंतर अनिल पाटील यांनी आपल्या विधानावरून माघार घेतल्याचं दिसत आहेत. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे हेच आता राज्याचे मुख्यमंत्री राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत.”
Published on: Jul 26, 2023 09:55 AM