महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा, अंजली दमानिया यांची मागणी

| Updated on: Dec 26, 2024 | 6:11 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील वाढत्या गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विरोधकांनी शनिवारी २८ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात आणखी एका मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड येथील वाढत्या गुंडगिरीची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी शनिवारी २८ डिसेंबर रोजी विरोधी पक्षांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतली आहे. या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचाही पिस्तुल हातात घेतलेला फोटो देखील आहे. अंजली दमानिया यांनी बीड येथील अनेक तरुणांचे हातात रिव्हॉल्वर घेतलेले फोटो शेअर केले आहेत. एक जिल्ह्यात सर्वाधिक शस्र परवाने वाटल्याचा आरोप मागे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळात केला होता. आता सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी सोशल मिडीयावर तरुणांच्या हातातील रिव्हॉल्वर घेतलेले फोटो व्हायरल झालेले फोटो ट्वीट केले आहेत. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, गुंडांचा नाही असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. राज्यातील सर्व शस्रास्र परवान्याची चौकशी लावावी आणि गरज नसलेल्यांचे परवाने तातडीने रद्द करावेत अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

Published on: Dec 26, 2024 06:11 PM
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
Dr. Manmohan Singh : देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा अल्पपरिचय