काँग्रेसची ‘ही’ कृती अयोग्य, मग तुमच्यात आणि भाजपमध्ये फरक काय?, राष्ट्रवादीची काँग्रेसवर टीका
कर्नाटक विधानसभा शुद्धीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रसने, काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी शुद्धीकरणावरून काँग्रेसवर टीका केलीय. "ज्या विधनासभेचं शुद्धीकरण केलं त्यात काँग्रेसचेही आमदार बसले होते ना? मग तुमच्यात आणि भाजपमध्ये फरक काय?", असा सवाल अंकुश काकडे यांनी काँग्रेसला विचारला आहे.
पुणे : कर्नाटक विधानसभा शुद्धीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रसने, काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी शुद्धीकरणावरून काँग्रेसवर टीका केलीय. “ज्या विधनासभेचं शुद्धीकरण केलं त्यात काँग्रेसचेही आमदार बसले होते ना? मग तुमच्यात आणि भाजपमध्ये फरक काय?”, असा सवाल अंकुश काकडे यांनी काँग्रेसला विचारला आहे. “काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे. त्यांनी अशा पद्धतीने धार्मिक विधी करणं चुकीचं आहे. विधानसभा शुद्धीकरण करणं मला अयोग्य वाटलं. मग काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक काय राहिला? यावर काँग्रेसच्या नेत्यांनी विचार केला पाहिजे”, असं काकडे म्हणालेत.
Published on: May 23, 2023 01:46 PM