अण्णा हजारे उचलणार टोकाचे पाऊल, आव्हाड यांना ‘ते’ विधान भोवणार

| Updated on: Oct 05, 2023 | 9:10 PM

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली होती. त्यावर अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. माहिती अधिकार कायद्यामुळे अनेक पक्ष कार्यकर्त्यांचे वाटोळे झाले असा टोला त्यांनी आव्हाड यांना लगावला.

अहमदनगर : 5 ऑक्टोबर 2023 | राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट केला. या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी ‘या व्यक्तीमुळे देशाचे वाटोळं झालं’ असं म्हणत अण्णा हजारे यांच्यावर टीका केली होती. आमदार आव्हाड यांच्या या टीकेला अण्णा हजारे यांनी उत्तर देताना यांनी ‘माझ्यामुळे देशाचा वाटोळ झालं नाही, तर माझ्या आंदोलनामुळे अनेक देश हिताचे कायदे झाले आहेत. मी देशभरात फिरत असताना माहिती अधिकार कायद्याबाबत लोक मला चांगल्या प्रतिक्रिया देतात. मात्र, अनेक पक्ष कार्यकर्त्यांचे वाटोळे झाले असल्याचं नाकारता येत नाही असा टोला लगावलाय. तसेच अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात वकिलांचा सल्ला घेऊन अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असं सांगितलंय.

Published on: Oct 05, 2023 09:10 PM
25 वर्ष सेवा, अखरेचा निरोप, मुंबईकर भारावले
‘डोक्यावर परिणाम, संजय राऊत लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये…’, कुणी दिला इशारा?