‘वाघ निघाले गोरेगावला…!’ शिंदेंच्या शिवसेनेकडून वर्धापनदिनाचं पोस्टर प्रकाशित
शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी शिवसैनिकांकडून सुरू आहे. पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गटात शिवसेनेच्या वर्धापनदिनावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापनदिनानिमित्त शिंदे यांच्या शिवसेनेकडून पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहेत.
ठाणे: शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी शिवसैनिकांकडून सुरू आहे. पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गटात शिवसेनेच्या वर्धापनदिनावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापनदिनानिमित्त शिंदे यांच्या शिवसेनेकडून पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहेत. 19 जूनला शिंदेंच्या शिवसेनेकडून गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. ‘वाघ निघाले गोरेगावला’ असं या पोस्टरवरती उल्लेख करण्यात आला आहे. हे पोस्टर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून व्हायरल केलं जात आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Published on: Jun 14, 2023 10:27 AM