महाराष्ट्र भूषण सोहळ्यावरून सरकारवर काँग्रेसचा निशाना; केली सरकारवर विरोधात ही मागणी
Image Credit source: tv9

महाराष्ट्र भूषण सोहळ्यावरून सरकारवर काँग्रेसचा निशाना; केली सरकारवर विरोधात ‘ही’ मागणी

| Updated on: Apr 17, 2023 | 7:32 AM

उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. त्यावरून विरोधक आता आक्रमक झाले आहेत. यावरून काँग्रेसने सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे

नवी मुंबई : आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्मघातामुळे 50 च्यावर सदस्यांना त्रास झाला आहे. तर यामध्ये 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आता समोर येत आहे. इतरांवर नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेत उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. त्यावरून विरोधक आता आक्रमक झाले आहेत. यावरून काँग्रेसने सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. यावेळी काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी आपली प्रतिक्रिया देताना, हा सरकारचा कार्यक्रम असल्याचे गाजावाजा करत करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर उष्णता असतानाही तो भर दुपारी घेण्यात आला. सरकारकडे हवामान खातं आहे. सगळी चौकशी करून तो घेता आला असता किंवा तो सकाळी घेता आला असता. पण असं झालं नाही. फक्त काही लोकांच्या प्रेमापोटी हा कार्यक्रम मॅनेज करण्यात आला. हे सरकार लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी संवेदनशील नाही. अजूनही शेतकऱ्यांच्या शेततले पंचनामे झालेले नाहीत. तो मेला काय आणि जगला काय? तर आज या कार्यक्रमात जे मृत्यु झाले आहेत त्याला सरकार जबाबदार आहे. सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

Published on: Apr 17, 2023 07:32 AM
अजित पवार भाजपसोबत आले तर…, शिंदे यांच्या शिवसेनेचं काय होणार? बघा स्पेशल रिपोर्ट
बीडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, १४ तासांनंतर ‘या’ गावात गारांचा खच, बघा व्हिडीओ