रोगराई आल्यावर तर लोकांना हे सरकार वाऱ्यावर सोडलं; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची सडकून टीका
यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी देखील सरकारवर निशाना साधला आहे. त्यांनी महाराष्ट्र भूषण सोहळा कार्यक्रमाचे नियोजनाची जबाबदारी सरकारची होती. त्या लोकांची काळजी घेण्याचं काम हे सरकारच होतं
नवी मुंबई : आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्मघातामुळे 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आता समोर येत आहे. त्यानंतर यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसत आहे. काँग्रेकडूण यावरून सरकारला निशाना करण्यात आला आहे. तर नाना पटोले यांनी सरकारमधील लोकांनी राजीनामा द्यायला पाहिजे असे म्हटलं होतं. तर यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी देखील सरकारवर निशाना साधला आहे. त्यांनी महाराष्ट्र भूषण सोहळा कार्यक्रमाचे नियोजनाची जबाबदारी सरकारची होती. त्या लोकांची काळजी घेण्याचं काम हे सरकारच होतं. परंतु फक्त कार्यक्रम घेऊन हजारो लोकांना असं उन्हात बसून फक्त त्रास देण्यात आला. याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे. आज जी मदत घोषीत केली आहे. त्यावरून गेलेले लोक परत येणार आहेत का असा सवाल देखील त्यांनी करताना हे सरकार असंवेदनशील असल्याची टीका केली आहे. तर सगळ्या सोयी केल्याचे दाखवता तर मग डोक्यावर एक कापड लावता आलं नाही या सरकारला. जे सरकार लोकांना उन्हात बसवत ते एखादी रोगराई आल्यावर काय करणार? हे सरकार लोकांना मरण्यासाठी वाऱ्यावर सोडून देणार अशी टीका केली आहे.